केंद्राने यंदाच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा – कृषिमंत्री दादाजी भुसे
राज्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय खतं आणि रसायन मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली.
राज्याला खताचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. गेल्या वर्षी खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता.
यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन २ लाख टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे ४४ लाख ५० हजार टन खत पुरवठ्याची मागणी या भेटीत केंद्र भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
