आज CSTM च्या किल्ल्यावर महिलांचा पहारा…
आज जागतिक महिला दिन. जगभर हा दिवस समस्त महिला वेग-वेगळ्या गोष्टी करून साजरा करत आहे. कोणी ऑफिस मध्ये केक कापले, कोणी सुंदर शी ड्रेसिंग केलीय तर काहींनी चक्क सुट्टी मारून थेट पिकनिक काढलीय. पण सरकारी महिला कर्मचारी आणि तेही गणवेशातले असतील तर त्यांच्या सेलिब्रेशनला खूपच मर्यादा असतात. पण आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आज तिथे १००% फक्त महिला तिकीट तपासनीस आणि आर.पी.एफ. यांची ड्युटी लावण्यात आली आहे. एकूणच CSTM च्या किल्ल्यावर महिला सैनिकांचा पहारा आहे. आणि प्रवासीही त्यांना सहकार्य करत आहेत. अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे महिला दिन साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी त्यांच्या वरिष्ठांचे आभार मानले आहेत.
