Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी रद्द

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी रद्द
सांगली: सांगली जिल्ह्यात शेकडो वर्षाची परंपरा असणारा, कडेगाव मोहरम उत्सव यावर्षी स्थगित करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा उत्सव प्रसिद्ध आहे. भाविक मोठ्या संख्येनं त्यात सहभागी होतात.

रंगी बेरंगी उंच ताबुत भेटी पहायला भाविक दरवर्षी गर्दी करतात. कोरोना साथीमुळे सर्व यात्रा, उत्सव स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा मोहरम स्थगित करण्याचा निर्णय कडेगांवच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. मोहरम ताबुत मालक आणि यात्रा कमेटीच्या  बैठकीत यंदाचा उत्सव स्थगित  करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *