कोविडमुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांच्या मदतीची केंद्र सरकारकडून शिफारस
नवी दिल्ली: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांच्या मदतीची शिफारस केली आहे, असं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.
कोविडमुळे मृत्यू झाला असल्याचं प्रमाणित झाल्यानंतर राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे ही रक्कम दिली जाईल. भविष्यातही कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ही भरपाई दिली जाईल, असं केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
