उद्याच्या १ फेब्रुवारीपासून राज्यातील न्यायालयांचं कामकाज होणार सुरळीत
मुंबई: राज्यासह, गोवा आणि दादरा नगर हवेली या, मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येत असलेल्या सर्व कनिष्ठ न्यायालयांचं कोरोनामुळे बंद असलेलं कामकाज येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. गेली जवळपास वर्षभर न्यायालयाचं बव्हांशी कामकाज ऑनलाईन सुरु होतं.
मात्र १ फेब्रुवारीपासून १०० टक्के न्यायालयं प्रत्यक्षात सुरु होतील आणि कोरोनापूर्व काळाप्रमाणेच कामकाज चालेल असं मुंबई उच्च न्यायालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कामकाजाच्या काळात न्यायालयातल्या तसंच न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक नियम पाळणं बंधनकारक असेल असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
