कोरोना बाधितांची संख्या १३० वर, वाशीत ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज हा आकडा १३० वर गेला आहे. शिवाय वाशीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४ वर गेला आहे. मुंबईतील प्रभादेवी भागात राहणाऱ्या कॉर्पोरेट ऑफिस बाहेर खाद्य पदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
सध्या मुंबई आणि परिसरात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते आहे. शिवाय सांगली सारख्या जिल्ह्यात ही नवीन रुग्ण समोर येत आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात राहणे गरजेचे आहे.