Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेसने नागपुरात निवडणूक लढवण्यासाठी भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय – मुख्यमंत्री

काँग्रेसने नागपुरात निवडणूक लढवण्यासाठी भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय – मुख्यमंत्री

नागपूर: भाजपचे उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचारासाठी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, भंडाऱ्यात जाऊन तेथील लोकांना विचारा पटोले यांनी तिथे एक तरी प्रकल्प किंवा कारखाना सुरू केला का? आजपर्यंत फक्त पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना पटोले यांनी केलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी एकत्रितपणे अनेक सभा घेत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली.

नाना पटोले हे २०१४ मध्ये भाजपमधून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून आले होते. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नागपुरात भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले अशी लढत रंगणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *