काँग्रेसने माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा; सेनेला मानले आभार
मुंबई: २१ मे रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेसने आपला १ उमेदवार मागे घेतल्याची खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. ते आपल्या म्हणाले की, “महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक उमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेशअध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे.”
आज दिवसभर या संदर्भात खलबत चालू होती ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत निवडणूकच न लढवण्याचा इशारा काँग्रेसला दिला होता. पण काँग्रेसने दोन पावलं मागे जात दोन पैकी एक उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला.
