शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरला, १८० लोकं मृत्युमुखी, ३०० पेक्षा जास्त मृत्युमुखी
भारतात निवडणुकीचे रणसंग्राम चालू असताना शेजारी देश श्रीलंका हा दहशतवादी हल्ल्याने हादरून गेला आहे. ईस्टर संडे निमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबो शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटाने हादरून गेली. हे बॉम्बस्फोट मुख्यत्वेकरून चर्च व पंचतारांकित हॉटेल मध्ये करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण आठ बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. यात जवळपास १८० लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. या स्फोटांत ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे कळते. तसेच सर्व भारतीय नागरिक सुखरूप आहेत अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटाने कोलंबोचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाहीये.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुढील हेल्पलाईन नंबर प्रसारित केला आहे. 94777903082. तसेच कोलंबोतील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
