Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोळसा खाणींतील पाण्यामुळे ९०० गावांतील १८ लाख लोकांना होत आहे लाभ

कोळसा/लिग्नाईट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हरित अभियानाला देत आहेत गती

नवी दिल्‍ली, दि. १३: कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, कोळसा/लिग्नाइट पीएसयु अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाणीतील पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी अनेक पावले उचलत असून ते त्यांच्या अधिकार क्षेत्रांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि सिंचनासारख्या सामुदायिक वापरासाठी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. कोळसा/लिग्नाईट सार्वजनिक उपक्रमांद्वारे संचालित खाणींमधून सोडले जाणारे पाणी तसेच वापरात नसलेल्या खाणीमधल्या पाण्याचा, कोळसा खाण क्षेत्राच्या जवळपास असलेल्या ९०० गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे १८ लाख लोकांना या पाण्याचा लाभ मिळत आहे.

चालू आर्थिक वर्षात, कोळसा/लिग्नाईट पीएसयुनी सामुदायिक वापरासाठी सुमारे ४००० एलकेएल खाणींतील पाणी पुरवण्याची योजना आखली होती, त्यापैकी डिसेंबर २०२२ पर्यंत २७८८ एलकेएल पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यातून ८८१ एलकेएल पाणी पिण्यासह घरगुती कारणांसाठी वापरण्यात आले आहे. खाणींतील या पाण्याचे लाभार्थी हे प्रामुख्याने आदिवासी आणि दुर्गम भागात राहणारे आहेत. हा प्रयत्न शासनाच्या जलसंधारणाच्या जलशक्ती अभियानाच्या अविरत प्रयत्नांचाच एक भाग आहे.

२०२२-२३ मध्ये, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने १५१० हेक्टर जमिनीवरील वार्षिक वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आधीच पार केले असून वित्तीय वर्ष २३ च्या डिसेंबर अखेरपर्यंत १६०० हेक्टर पर्यंत याचा विस्तार केला जात आहे आणि त्यानुसार कोल इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२२ पर्यंत ३१ लाख रोपांची लागवड केली आहे.

सीड बॉल प्लांटेशन, ड्रोनद्वारे सीड कास्टिंग आणि विविध खाणींमध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण यासारख्या नवीन तंत्रांचा वापर सुरू आहे. उत्खनन केलेले क्षेत्र, ओव्हरबर्डन डंप आणि इतर विस्कळीत क्षेत्रे सक्रिय खाण क्षेत्रामधून अलग झाल्यानंतर लगेचच पुन्हा त्यांचा ताबा घेतला जातो. हे वनीकरण उपक्रम आणि हरित पट्टा विकासाची कामे देखील कार्बन सिंक तयार करत आहेत.यामुळे घनदाट वृक्षांची सावली तयार होऊन वायू प्रदूषण नियंत्रित होण्यास देखील मदत होते, खाणकामादरम्यान  उत्सर्जित धूलिकणांना अटकाव करते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *