विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक येत्या २४ आणि ३१ जानेवारीला होणार
विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानपरिषदेचे सदस्य तानाजी सावंत आता विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक येत्या २४ आणि ३१ जानेवारीला होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पोटनिवडणुकीला उभे राहू शकतात असे मानले जाते. ते कोणत्या जागेवरून लढू शकतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दिनांक २४ जानेवारीला होणार्या पोटनिवडणुकीची अधिसूचना ७ जानेवारीला जारी होणार असून, १४ जानेवारी ही नामनिर्देशनपत्रे भरण्याची मुदत आहे. १५ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि १७ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
गरज पडल्यास २४ तारखेला सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर दुसर्या जागेसाठी येत्या ३१ जानेवारीला मतदान होईल.
