विधानपरिषद सदस्यत्वासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भरला अर्ज
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळापूर्वी भरला. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पुत्र तेजस ठाकरे उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें नंतर विद्यमान विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपला अर्ज भरला. एकूण ९ जागांसाठी या निवडणुका होत असून काल काँग्रेसने आपला एक मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
