“शेतकऱ्यांनी पूर्णपणे सरकारवर विश्वास ठेवला” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले शेतकऱ्यांचे आभार
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत सामना च्या संपादक पदापासून ते शेतकरी कर्जमुक्ती पर्यंत अनेक विषयांना स्पर्श केला.
यावेळी ते म्हणाले की, “मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची अंमलबजावणी दोन महिन्यांत सुरू झाली आणि मला शेतकऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्या २ महिन्यांत त्यांनी कुठेही त्यांचा संयम सोडला नाही. त्यांनी पूर्णपणे सरकारवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळेच आम्ही ही योजना आणि यंत्रणा चांगल्या पद्धतीने लावू शकलो.”
पुढे ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे कर्जमुक्ती योजनेचे व्यवस्थित काम सुरू आहे आणि लवकरात लवकर ही योजना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमधील ५ लाखांच्या आसपासची यादी तयार आहे पण आचारसंहितेमुळे आम्ही लावू शकलेलो नाही आहोत.”
शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील त्यावर आणखी काही योजना काढता येतील का ते आम्ही बघतो आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
–
