मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे उद्घाटन
मुंबई/नागपूर: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काँफेरेन्स च्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत नागपूरच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मार्गावरील मेट्रोचे उद्घाटन केले. यासोहळ्याला प्रत्यक्ष नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख व नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात ६ स्थानकांसह ११ किलोमीटर लांबीची लाईन आजपासून कार्यान्वित होणार आहे. संपूर्ण प्रकल्पामध्ये २० स्थानकांसह १८.५ किमी लांबीची लाईन प्रस्तावित आहे. हिंगणा तालुक्यातील १५०००० नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे.
