Video: जाता जाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “मी पुन्हा येईन…..”
मुंबई: विधिमंडळात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभीभाषणा शेवटी एक कविता सादर केली. या कविते मार्फत त्यांनी मी स्पर्धेत आहे आणि पुढेही राहणार आहे, मी पुन्हा येणार आहे असे विरोधी पक्षातल्या नेत्यांना तसेच स्वपक्षातील नेत्यांनाही काव्यात्मक इशाऱ्याने सांगितले आहे.
कविता सादर करताना ते म्हणाले,
मी पुन्हा येईन..
याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन..
गावांना जलयुक्त करण्यासाठी,शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..
मी पुन्हा येईन….
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
मी पुन्हा येईन….
याच निर्धारानं,याच भूमिकेत,याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवं रूप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
मी पुन्हा येईन….#MonsoonSession pic.twitter.com/fsq1rAT55b
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 2, 2019
ही सादर केल्यानंतर सत्ताधारी शिवसना-भाजप च्या सदस्यांनी बाकडे वाजवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कवितेला दाद दिली.
