सीआयएससीई बोर्ड चे १०वी आणि १२वी चे निकाल जाहीर
सी आय एस सी ई अर्थात भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं इयत्ता १० वी आणि १२ वीच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल cisce.org या संकेत स्थळावर पाहू शकतील किंवा ०९२४८०८२८८३ या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएस पाठवूनही निकाल समजून घेता येईल.
