Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अनधिकृतरित्या होणाऱ्या दुतर्फा पार्किंगमुळे करिरोड ते चिंचपोकळी रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा, प्रशासन सुस्त

अनधिकृतरित्या होणाऱ्या दुतर्फा पार्किंगमुळे करिरोड ते चिंचपोकळी रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा, प्रशासन सुस्त

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून डिलाईल रोड परिसरात, ना. म. जोशी मार्गावर दुतर्फा अनधिकृतरित्या गाड्या पार्क करण्यात येत आहेत. विशेष करून चिंचपोकळी ते करिरोड वर मोनो रेल्वे च्या खालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पदचाऱ्यांना भरधाव वाहनांची धडक बसणे आता नित्याचे झाले आहे. थोड्याच वेळापूर्वी पोद्दार मिल कंपाऊंड ला लागून असलेल्या ‘आमची सावली’ इमारतीच्या मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने एका पादचाऱ्याला रस्ता पार करताना धडक देत गंभीर जखमी केले. सदर रुग्णाला स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या गाडीतून नायर इस्पितळात तात्काळ नेण्यात आले.

या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे चालताना समोरून जर बेस्ट ची बस अथवा मोठा डंपर येत असेल तर जीव मुठीत ठेवूनच चालावे लागते. विशेष करून पोद्दार मिल च्या बाजूने पदपथावर असलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना नाईलाजाने मूळ वाहतुकीच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. मुंबई पोलीस व वाहतूक विभाग याकडे का कानाडोळा करतोय हे अनाकलनीय आहे. पोलिसांनी या रस्त्यावरील अनधिकृतरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा पोलीस स्थानकावर विराट मोर्चा काढावा लागेल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *