चीनमधील मुस्लिमबहुल शिनजीयांग प्रांतात सरकारी अधिकारी, विद्यार्थ्यांना ‘रोजे’ ठेवण्यास प्रतिबंध
चीन: चीन च्या शिनजीयांग प्रांतातल्या मुस्लिमांना सध्या वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथे राहणाऱ्या मुसलमानांच्या विरुद्ध कठोर प्रतिबंध लावले जात आहेत. रमजानची सुरुवात होताच मुस्लिम बहुल शिनजीयांग प्रांतात सरकारी अधिकारी, विदयार्थी व लहान मुलांना रोजे(उपवास) ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीन च्या सरकारी संकेतस्थळावर या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.
शिनजीयांग प्रांतात चीन मधले कम्युनिस्ट पक्षाचे नेते या बंदीसाठी पुढाकार घेत आहेत. चीन चा सर्वात प्रमुख मित्र पाकिस्तानही या मुद्द्यावर काही बोलण्यास तयार नाही. काही काळापूर्वी व्यापारी करारासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनचा दौरा केला होता हे विशेष.
चीनने दावा केला आहे की शिनजीयांग ओईगर रिजन(एक्सयूएआर) मध्ये सामाजिक स्थिरता राखून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ह्युमन राईट्स वॉच(एचआरडब्ल्यू)ने या आठवड्यात जाहीर केलेल्या रिपोर्ट मध्ये या बाबत मत मांडले आहे. संयुक्त राष्ट्राच्या वंशभेद उच्चाटन समितीने उईगर मुस्लिमांसोबत चीनकडून केल्या जाणाऱ्या वर्तनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलंय की री-एज्युकेशनल कॅम्प मध्ये दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांकडून तेथील मुसलमानांना त्यांच्या जीवन आणि राजकीय विचारांबाबत प्रश्न विचारले जातात. एक प्रकारे ते त्यांचे राजकीय शुद्धीकरण करू इच्छितात. यात सदैव इस्लाम चे पुढारीपण घेणारा, धर्मांध दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा व भारतात त्याचे विष पेरणारा पाकिस्तान या गोष्टीचा साधा निषेध करत नसल्याकारणाने त्याची दुटप्पी भूमिका जगासमोर आली आहे.
The world shrugs as China locks up 1 million Muslims
"If right now, just about any other country in the world was found to be detaining over 1 million Muslims of a certain ethnicity, you can bet we’d be seeing an international outcry." @SophieHRW https://t.co/jIdCvoEMRu @axios pic.twitter.com/67vZy73cBk
— Human Rights Watch (@hrw) May 7, 2019
