Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कोरोना संकटानंतर काँग्रेसमध्ये होणार अनेक भूकंप” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारावजा गौप्यस्फोट

“कोरोना संकटानंतर काँग्रेसमध्ये होणार अनेक भूकंप” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारावजा गौप्यस्फोट

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी आज एक गौप्यस्फोट केला. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, राज्यातील कोरोनाच संकट संपल्यावर देशपातळीवरील व राज्यातील काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार आहेत. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्देशून ते म्हणाले की, ” बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा तुम्हाला कुठेही भवितव्य नाही.”

एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेत काम करतो. आम्ही आमच्या अजेंड्यानूसार चालतो. केवळ घरातल्यांना मोठं करणं हा आरएसएस चा पर्यायाने भाजपचा अजेंडा नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंना का नाकारलं याचं अप्रत्यक्ष कारण सांगितलं. विधानपरिषद निवडणुकांत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या इच्छुकांना डावलल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढलेला पाहायला मिळतोय तो कमी करताना चंद्रकांत पाटील यांचा कस लागतोय इतकं नक्की.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *