Devendra Fadanvis
मध्य रेल्वेची लोकल आता मुरबाड, अलिबागपर्यंत धावणार
मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना आखली आहे. पेण ते अलिबाग तसेच कल्याण ते मुरबाड मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
15 डब्यांची लोकल, परळ टर्मिनस, पुणे ते नागपूर ‘हमसफर एक्सप्रेस’या सेवांचं उद्घाटन, नेरळ ते माथेरान गाडीला पारदर्शक डबा, पेण ते थळ आणि जासई-उरण विद्युतीकरण, दिवा, कुर्ला, सायन, जीटीबी नगर, महालक्ष्मी आणि पालघर स्थानकात पादचारी पूल इत्यादी सुविधाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि गोयल यांच्या हस्ते रविवारी उद्धाटन करण्यात आलेे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांसाठी आणखी 180 सरकते जिनेही मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान नवीन चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. तसेच उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह अन्य परिवहन सेवांसाठी लवकरच एकात्मिक तिकिट प्रणाली आणण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
