Dadar Railway Station
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर ते भायखळा लोकल खोळंबा
चाकरमानी घरी जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. परळ ते माटुंगा दरम्यान पाच ते सहा लोकल एका मागोमाग एक थांबल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या कडक उन्हात प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे.
कल्याण वरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकडून कल्याण, कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ४५ ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत.
