सी.बी.एस.ई. चा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलीच बाजीगर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) ने आज गुरुवार (दि.२) रोजी बारावीचा निकाल घोषित केला. ५०० पैकी ४९९ गुण मिळवत पहिल्या स्थानी अनुक्रमे गाजियाबादची हंसिका शुक्ला व मुजफ्फरनगरची करिष्मा अरोरा या दोन मुलींनी बाजी मारली आहे. त्याचवेळी अनुक्रमे हरियाणाची भाव्या, ऋषिकेश इथली गौरंगी चावला आणि रायबरेलीची ऐश्वर्या यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवत दुसरं स्थान पटकावलं आहे.
विद्यार्थी आपला निकाल www.cbse.nic. in वर पाहू शकता. या वर्षी १२वी च्या परीक्षेला एकूण १२.८७ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी बसले होते. सरासरी निकाल ८३.४० टक्के लागला. विभागवार पाहायला गेले तर त्रिवेंद्रम विभागाचा सर्वात जास्त ९८.२० टक्के इतका निकाल लागला आहे. सलग ५व्या वर्षी सीबीएसई निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
सरासरी निकाल : ८३.४०%
मुली : ८८.७०%
मुलं : ७९.४०%
ट्रान्सजेंडर : ८३.३०%
