“सीबीआय ला कोणतेच पुरावे सादर करता आले नाहीत” म्हणत बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने ३२ जणांना केलं दोषमुक्त
उत्तर प्रदेश, दि.३०: अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी विध्वंस प्रकरणी आज बुधवारी सीबीआय कोर्टाने ऐतिहासिक निर्णय जाहीर करत ३२ आरोपींना दोषमुक्त केलं आहे. कोर्ट म्हणालं की सीबीआय ला कोणतेच पुरावे सादर करता आले नाहीत. या विध्वंसामागे कोणताच कट असल्याचे दिसत नाही, लोकांचा आक्रोश उत्स्फूर्त होता. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी असलेल्या दिवंगत अशोक सिंघल यांना क्लीन चिट देताना न्यायालय म्हणालं की तिथे रामाच्या मूर्ती असल्यामुळे सिंघल उलट प्रक्षुब्ध कारसेवकांना विध्वंस करण्यापासून रोखत होते.
सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव म्हणाले की वृत्तपत्रांत छापलेल्या बातम्यांना या प्रकरणी प्रमाण मानता येऊ शकत नाही कारण या बातम्यांचे स्तोत्र जाहीर केलेले नाहीत. याच सोबत फोटोज ची निगेटिव्ह नसणे व पुराव्या दाखल जमा करण्यात आलेल्या व्हिडिओच्या स्पष्टतेबाबतही कोर्टाने प्रश्न उपस्थित केले.
‘हे’ झाले दोषमुक्त
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर
