जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक
भारताच्या निखत झरीननं महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. ५२ किलो वजनी गटात तिनं थायलंडच्या जितपोंग जितामास हिला ५-० असं पराभूत केलं. हे भारताचं १० वं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी मेरी कोम हिनं ६ तर लेखा केसी, जेनी आर एल आणि सरिता देवीनं प्रत्येकी एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.