सुविधा रद्द करण्यात येत असल्याबाबत राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती
मुंबई, दि. ११: यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेपासून निर्धारित वेळेच्या दहा मिनिटं आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा रद्द करण्यात येत असल्याचं, राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितलं. समाज माध्यमांवर होणार्या पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कॉपीमुक्त परिक्षेसाठी भरारी पथकांशिवाय बैठी पथकं, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्या समन्वयातूनही भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Source – AIR
