BMC-Building-1
नालेसफाईबाबत जर तुमच्या मनात शंका असेल तर ‘या’ ऍप वरून मुंबई महानगरपालिकेला फोटो पाठवा!
मुंबई: मॉन्सून अजून मुंबईच्या उंबरठ्यावर रेंगाळलाय. मुंबई महानगरपालिकेसाठी त्याचा आगमन सोहळा हा महत्वाचा आहे. कारण पालिकेने नालेसफाईची परीक्षा दिली आहे पण जर सालाबादप्रमाणे पाणी तुंबलं तर गई भैस पानीमे पालिकेवर सालाबादप्रमाणे नापास हा शिक्का बसू शकतो. यावर पालिकेने नामी युक्ती काढली आहे. जर कोणाला नालेसफाईच्या कामात आणि प्रत्यक्ष ठिकाणी काही तफावत आढळली तर ते त्या ठिकाणाचा फोटो पाठवू शकतात. यासाठी पालिकेने ‘MCGM 24 x 7’ या आपल्या ऍपमध्ये ‘डीस्टीलिंट’ नावाने नवीन मॉड्युल विकसित केले आहे.
सदर ‘मॉड्युल’मध्ये नालेसफाई करण्यापूर्वची, झाल्यानंतरची छायाचित्रं दिनांक व वेळेच्या माहितीसह अपलोड करण्यात आली आहेत. या ऍप मधील छायाचित्रे व प्रत्यक्ष नालेसफाई केलेलं ठिकाण यात जर विसंगती आढळली तर या याबाबतची छायाचित्रे अपलोड करून सत्य निदर्शनास आणता येऊ शकतं. अँड्रॉइड गूगल च्या ‘प्ले स्टोअर’ वरून ‘MCGM 24 X 7’ डाउनलोड केल्यावर होम स्क्रीन वरून तुम्ही हे मॉड्युल पाहू शकता.
सदर ऍप ची लिंक पुढीलप्रमाणे
https://play.google.com/store/apps/details?id=in.cdac.gov.mgov.mcgm
