‘महाराष्ट्र वार्ता’च्या बातमीवर मुंबई महापालिकेकडून २४ तासांत ऍक्शन; वादळात पडलेली झाडं हलवत मोकळा केला रस्ता
मुंबई दि. ९: काल महाराष्ट्र वार्ता ने मुंबईतील चिंचपोकळी पूर्व परिसरातील एका समस्येकडे मुंबई महापालिकेचे बातमीद्वारे लक्ष वेधले होते. या परिसरातील सजग नागरिकांनी ट्विटर वर महाराष्ट्र वार्ता ला टॅग करत या समस्येकडे आमचे लक्ष वेधले होते. चिंचपोकळी (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाजवळील रस्त्यावर गेल्या ४ दिवसांपासून नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे उन्मळून पडलेल्या झाडांच्या फांद्या पडून होत्या. काल बातमी प्रसारित झाल्यानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आणि २४ तासांच्या आत यावर ऍक्शन घेतली.
कारवाई करता येत नसेल तर मुंबई महापालिकेकडून ट्विटर वर उत्तरं देण्याचा फार्स कशाला – Maharashtra Varta#bmc @mybmc @mybmcWardE #chinchpokali #mumbai #lalbaug @KishoriPednekar https://t.co/ugyS8aY8BT
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) August 8, 2020
आज रविवार असूनही मुंबई महापालिकेच्या ई प्रभागातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येत गेल्या ४ दिवसांपासून पडून असलेल्या झाडांच्या फांद्या व कचरा उचलत रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला. महाराष्ट्र वार्ता ची आपली समस्या टीम या व अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत अग्रणी आहे. तुमच्याही काही सामाजिक समस्या असतील तर त्याबाबत आम्हाला व्हाट्सअप्प व ई-मेल द्वारे कळवू शकता. ९३७२२३६३३२(व्हाट्सअप्प)
news@maharashtravarta.com
