उद्यापासून मराठी पाट्या नसणार्या दुकानं, कार्यालयांवर मुंबई महापालिका करणार कारवाई
मुंबई, दि. ६ : मुंबईत मराठी पाट्या नसणारी दुकानं, आस्थापनांवर गुरुवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकानं, आणि आस्थापन असून त्यापैकी ५० टक्के दुकानांकडून मराठी पाट्या बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित दुकानांवर मराठी पाट्या बसवण्यासाठी कारवाई करण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे.
