रा.कॉं. अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार उभा न करण्यासंदर्भात भाजपला केली होती विनंती
मुंबई, दि. १७ : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेना(UBT) उमेदवार रुतूजा यांना बिनविरोध विजयी होऊ देण्याची विनंती केली होती.
उमेदवारी मागे घ्यावी की नाही या मुद्द्यावर कालपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपसह शिंदे गटासोबत खलबतं चालू होती. अखेर आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की, त्यांचा पक्ष अंधेरी निवडणुकीतून उमेदवारी मागे घेत आहे. बावनकुळे यांनी या घोषणेसह मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार रमेश लट्टे यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवत असल्याची विनंती केली होती. त्यांच्यासमोर उमेदवार उभे करू नका असे आवाहन त्यांनी फडणवीस यांना केले होते.
