भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध, पहा कोण आहेत महाराष्ट्रातील उमेदवार
लोकसभा उमेदवारांची भाजपने आज दुसरी यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यामधून भाजपने अनिल शिरोळे यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ६ उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. भाजपने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
भाजपचे दुसऱ्या यादीतील उमेदवार
पुणे – गिरीश बापट
दिंडोरी – डॉ. भारती पवार
जळगाव – स्मिता वाघ
सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी
बारामती – कांचन कुल
