या दोन तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत बनवला ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’
पुरंदर, दि.२८: हिवाळा जवळपास संपत आला असून दिवसाचे कमाल तापमान आता हळूहळू वाढू लागले आहे. येत्या काळात प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे, नद्यांचे स्रोत आटल्यावर विशेषतः पक्ष्यांना फार वणवण करावी लागते. नेमक्या अशाच वेळी वाल्हे (कामाठवडी) तालुका पुरंदर जिल्हा पुणे यथील वृक्ष संवर्धन ग्रुप मधील तरुण कार्यकर्ते अमोल दुर्गाडे आणि महेश भुजबळ या दोन युवकांनी पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी थोडी आगळी वेगळी शक्कल लढवली आहे.

टाकाऊ पासून टिकाऊ या सूत्राप्रमाणे तेलाच्या मोकळ्या डब्यापासून पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी या युवकांनी एक बर्ड फीडर बनवला आहे. हा बर्ड फीडर खाद्य तेलाच्या एका १५ किलो च्या अल्युमिनियम कॅन पासून बनवण्यात आला आहे.

त्यांच्या वृक्ष संवर्धन या ग्रुप कडून गेली तीन वर्ष पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि छोटे-मोठे उपक्रम चालू असतात.
