भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या १० वर
भिवंडी, दि. २१: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं आज पहाटे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १० झाली आहे. धामनकर नाक्याजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारतीचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली.
एका लहान मुलासह सुमारे ३५ लोकांना वाचवण्यात आलं आहे. भिवंडीमध्ये अद्याप अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असून मदत आणि बचावकार्य वेगानं सुरु आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.
