बीएमसी ने अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली होती का?
मुंबई: मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून रुग्णांना मुलुंड इथल्या कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
मुंबईत भांडूपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या १० झाली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. काल मध्यरात्री ड्रीम्स ड्रीम्स मॉलमधल्या सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली होती. येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत होती का? याची पालिकेकडून तपासणी झाली होती की नव्हती याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जखमींची संख्या अजून स्पष्ट झाली नसल्याचं अग्निशमन विभागानं कळवलं आहे. या रुग्णालयातल्या ७३ रुग्णांना जवळच्या खासगी आणि सरकारी कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आगीमुळे या मार्गावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात आल्याचं बेस्टनं कळवलं आहे.
