भंडाऱ्यातल्या चिन्नोर तांदळाला मिळालं भौगोलिक मानांकन
भंडारा: भंडारा जिल्ह्यातल्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच जी आय टॅगिंग प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक जिल्ह्यांमध्ये अग्रक्रमावर असलेल्या भंडारातल्या सुगंधी चिन्नोर तांदळाची चव जगभराच्या खवय्यांना मिळावी आणि “चिन्नोर” तांदळाची मागणी वाढून शेतकरी समृद्ध आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावा याउद्देशानं गेल्या २ वर्षापासून या तांदळाला जी आय टॅग मिळावा यासाठी प्रयत्न सुरु होते. ग्लुटेन मुक्त असणाऱ्या चिन्नोर तांदळाचा इतिहास, त्याचं पोषण मुल्य, मोहक सुगंध इत्यादी वैशिष्ट्यांचा या मानांकनासाठी अभ्यास करण्यात आला.
Source – AIR
टीप – फोटो प्रतीनिधिक आहे
