सर ज.जी. शासकीय रुग्णालयात घेतली कोरोना व्हायरसविरोधी लस
मुंबई, दि.५: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज. जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लस घेतली होती.
