बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आज सकाळी आणखी तीव्र झाला आहे. कन्याकुमारी आणि श्रीलंकेमध्ये त्रिंकोमालीच्या दरम्यान ५३० किलोमीटरवर तो केंद्रित असल्याचं हवामान विभागाच्या ताज्या बातमीपत्रात म्हटलं आहे.
ताशी दहा किलोमीटर वेगाने हा पट्टा सरकत असून पुढील चोवीस तासात त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन तो पश्चिमोत्तर दिशेला सरकरण्याची शक्यता आहे. याच्या परिणामी कन्याकुमारी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
