बांग्लादेशी घुसखोरांविरुद्धच्या मोर्चासाठी राज ठाकरेंची मनसे सज्ज
मुंबई: सीएए च्या समर्थनार्थ व बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध आज मनसेचा महामोर्चा निघणार असून या मोर्चाला राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत जमा झाले आहेत. नवी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे इथून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आद्यपही येत आहेत. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार मोर्चा स्थळी पोहोचत आहेत.
या महामोर्चावेळी राज ठाकरे काय बोलतात या कडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गिरगाव जवळील हिंदू जिमखाना वरून निघणारा मोर्चा आझाद मैदानात संपणार आहे.
