सकारात्मक वार्ता: मुंबईतील बी. एल. नायर रुग्णालयात कोरोना पॉसिटीव्ह महिलांपासून ५०० बाळांची प्रसूती
मुंबई: मुंबईतील बी. एल. नायर रुग्णालयालाने कोरोना पॉसिटीव्ह राहीलेल्या ५०० मातांची आतापर्यंत प्रसूती केली आहे. यातील एकही माता अथवा बालक दगावले गेले नाहीये हे विशेष. काल मंगळवार दि. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी मालाड येथील एका महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आतापर्यंत ७२३ गरोदर महिलांनी नायर रुग्णालयात उपचार घेतले असून यातील ६५६ महिलांना घरी पाठवण्यात आलेले आहे. यातील ४६७ महिलांची प्रसूती आतापर्यंत झाली आहे. यातील आठ महिलांना जुळी तर एका महिलेला तीळ झालेलं आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात सर्व ठिकाणी नकारात्मक बातम्याच ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत अशा वेळी ही सकारात्मक अशीच वार्ता आहे. शिवाय ही बातमी अनेक गरोदर महिलांच्या मनातील भीतीही दूर घालवणारी आहे इतके नक्की.
