आझम खान सारख्या माणसांना अखिलेश यादव यांनी तिकीटच देऊ नये
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रामपूरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरांमधून त्यांच्यावर कडाडून टीका झाली. त्यासोबतच जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
रेणुका शहाणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “आझम खान सारख्या माणसांना अखिलेश यादव यांनी तिकीटच देऊ नये. ते सातत्याने अशी अपमानजनक वक्तव्य करत आहेत विशेषतः स्त्रियांबाबत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पण कठोर पावलं उचलली जातील का? या बाबत मी साशंक आहे. या निवडणुक वाढवण्यावर त्यांना बंदी आणली पाहिजे. लज्जास्पद”.
People like Azam Khan should not be given tickets by @yadavakhilesh He is a repeat offender in abusive comments especially against women. An FIR has been filed but will stringent action really be taken? He should not be allowed to fight this election! Shame!
— Renuka Shahane (@renukash) April 15, 2019
