एयू क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी, खाद्यपदार्थ आणि प्रवासावर २५,००० रुपयांपेक्षा होणार अधिक बचत
मुंबई, दि. १६: भारतातील सर्वात मोठी एसएफबी बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने (एयू एसएफबी), यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हल मोहिमेअंतर्गत आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे.
वर्षभरात नियमितपणे सर्वोत्कृष्ट ऑफर सादर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एयू एसएफबीने एयूच्या क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्ससाठी ही खास शॉपिंग ऑफर आणली आहे. महा सणासुदीसाठीची ही ऑफर येत्या १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीसाठी राहणार आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, घरगुती उपकरणे, खाद्यपदार्थ आणि किराणा, मनोरंजन, प्रवास, आरोग्य, ग्राहकपयोगी वस्तू, फर्निचर आणि वस्तू खरेदीसाठी ईएमआय आदींसाठी विविधांगी श्रेणीतील अनेक आघाडीच्या व्यापार कंपन्यांच्या साथीने या अनोख्या ऑफरचा विस्तार राहणार आहे.
एयू एसएफबीच्या ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रमुख ई-रिटेलर मंचावरील शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आकर्षक ऑफर देत आहे. एयू एसएफबीच्या योजनेमध्ये ३० पेक्षा जास्त दिग्गज ब्रँडचा सहभाग आहे. त्याचबरोबर आपल्या आवडीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ६० पेक्षा अधिक ब्रँड आणि उत्पादनांसाठी थेट ईएमआयचा (मासिक हप्ते योजना) पर्याय देण्यात आलेला आहे. रिलायन्स डिजिटल, क्रोमा, टाटा क्लिक (CLiQ), विजय सेल्स, गोस्टोअर डॉट कॉम सारख्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक ब्रँडवर ग्राहक आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात; त्याचबरोबर यात्रा, क्लियरट्रिप, ईझीमायट्रीपसारखे यात्रा पोर्टल्स; बिगबास्केट, ब्लिंकीट (Blinkit), जिओमार्ट, इंस्टामार्टसारखे ऑनलाइन किराणा विक्रेते; झोमॅटो, स्विगी, डोमिनोसारखे अन्न वितरण अॅप्स; आणि बूक मायशो, फार्मइझीसारख्या कितीतरी पर्यायांचा या ऑफरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचबरोबर या योजनेचा लाभ घेत मनसोक्त खरेदी करणाऱ्या १११५ भाग्यवान ग्राहकांना एयू स्मॉल फायनान्स बँक प्रीमियम स्मार्ट फोन आणि अॅमेझॉन व्हाउचरसारख्या आनंददायी तसेच आश्चर्यचकीत करणारे बक्षीस दिली जाणार आहेत.
भारतात सध्या सुरू असलेल्या जागतिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांदरम्यान, एयू एसएफबीने झोमॅटो मॅच डे स्पेशल ऑफरसह फूड ऑर्डर आणि भोजनाच्या नानाविध श्रेणींवर आकर्षक ऑफर आणल्या आहेत. स्पर्धेतील हे सर्व रोमांचक सामने पाहताना ग्राहक ऑनलाइन ऑर्डरवर २० टक्के (२०० रुपयांपर्यंत) आणि भोजनावर २० टक्के (१,००० रुपयांपर्यंत) सवलत मिळवू शकतात.
नवरात्री आणि दसऱ्यासाठी, एयू एसएफबीने आजपासून नऊ दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीचा धुमधडाका सादर केला असून त्यात खालील ऑफर्सचा समावेश आहे:
– स्विगी ऑर्डर आणि स्विगी इन्स्टामार्टवर २०० रुपयांची सवलत
– टाटा क्लिकवर २० % सवलत (१,००० रुपयांपर्यंत)
– ब्लिंकीटवर २० % सवलत (२०० रुपयांपर्यंत)
– झोमॅटो ऑनलाईन ऑर्डर आणि भोजनासाठी २० % सवलत
– बुकमायशोवर बाय वन गेट वन ऑफर (२५० रुपयांपर्यंत)
– यात्रा आणि ईझीगो(ixigo) च्या माध्यमातून देशांतर्गत हवाई प्रवासासाठी १५ टक्के सवलत (३००० रुपयांपर्यंत) तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी दहा हजार रुपयांपर्यंत सवलत
– गोस्टोअर डॉट कॉमवर १० टक्के सवलत (२००० रुपयांपर्यंत)
धनत्रयोदशीसाठी, एयू क्रेडिट कार्ड वापरून दागिन्यांच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅकचा आनंद ग्राहक घेऊ शकतील. रिटेल ग्राहकांसाठी याव्यतिरिक्त होम लोन, ट्रेड फॉरेक्स, गोल्ड लोन आणि लॉकरवर सणासुदीच्या विशेष ऑफर देखील एयू एसएफबी देत आहे. गृहकर्ज ग्राहकांना प्रक्रिया शुल्कावर ०.२५ टक्के सवलत मिळू शकते. गोल्ड लोन ग्राहकांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्काचा लाभ मिळू शकतो. लॉकर ग्राहकांना लॉकर्सच्या वार्षिक भाड्यावर १० टक्के अतिरिक्त सवलत मिळू शकते. ट्रेड आणि परकीय चलन सेवा आकर्षक किंमतींवर ऑफर केल्या जात आहेत. त्यात मुदत ठेवींच्या आधारे १०० टक्के इनलँड बँक गॅरंटी/लेटर ऑफ क्रेडिट प्रति वर्षासाठी अवघे १ टक्के शुल्क आकारणी करत दिले जाणार आहे, तर रिटेल रेमिटन्स फॉरेक्स मार्जिन (कुटुंबाची देखभाल/भेट/शिक्षण हेतू) ५० टक्के सवलतीसह दिले जात आहे.
एयू एसएफबी आपल्या एयू0101 अॅपद्वारे डिजिटल विश्वातील आपली उपस्थिती वाढवत असल्याने, यंदाच्या सणासुदीच्या ऑफरमुळे ग्राहकांच्या डिजिटल प्रवेशास आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. सणासुदीच्या काळात ग्राहक एयू0101 अॅपवर नोंदणी केलेले रिचार्ज, बिल पेमेंट, गिफ्ट कार्ड आणि बस तिकिटांवर आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हल ऑफरची घोषणा करताना, एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिबेरवाल (Tiberwal) म्हणाले, “गेल्या काही वर्षांत, एयू एसएफबीने आपल्या ग्राहकांना वर्षभर आकर्षक ऑफर देऊन पुरस्कृत केले आहे आणि त्यांना गुंतवून ठेवले आहे. ग्रामीण आणि निम-शहरी भारतात मजबूत उपस्थिती असलेल्या रिटेल बँकेच्या रुपाने आम्ही सणांचे महत्त्व आणि मूल्य जाणून आहोत. कारण सण मित्र आणि कुटुंबाना एकत्र आणतात. या सणासुदीच्या काळात, आमच्या ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हल या नवीनतम ऑफरसह, आम्ही आमच्या ग्राहकांशी असलेली बांधिलकी त्याचबरोबर त्यांचा आनंद या दोघांना नवीन उंचीवर नेले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही आघाडीच्या ब्रँड आणि स्थानिक व्यापार्यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी बक्षिसे आणि निवडीचा विस्तार आणखी व्यापक केला आहे. आमचे लक्ष आता मोठ्या ब्रँडच्या पलीकडे विस्तारले आहे आणि त्यात हायपरलोकल ब्रँडचासुध्दा समावेश आहे आणि ते आमचे सुविधा तसेच ग्राहककेंद्रित धोरण आणखी सुनिश्चित करते. आमच्या मल्टी-चॅनल धोरणाचा भाग म्हणून आम्ही डिजिटल अॅप एयू0101द्वारे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवर आकर्षक कॅशबॅक आणि सवलती देत आहोत. आमच्या ग्राहकांचे सणांचे क्षण आणखी आनंददायक आणि परिपूर्ण करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.”
