जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये नीरज चोप्रा आणि रोहित यादव अंतिम फेरीत प्रवेश
अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेक या क्रीडाप्रकारात भारताच्या नीरज चोप्रा आणि रोहित यादवने तर महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अन्नू राणीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या तिहेरी उडी क्रीडाप्रकारात भारताच्या एल्डहॉज पॉल यानेही अंतिम फेरीत धडक मारली असून या प्रकारात अंतिम फेरीत जाणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरज चोप्रा, रोहित यादव आणि एल्डहॉज पॉल यांचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच भालाफेक आणि तिहेरी उडी प्रकारात भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पोचले आहेत असं त्यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.