रिसोड तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रस्त्यांच्या विविध कामांसंदर्भात झालेल्या बैठकीत आमदार अमित झनक, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे उपस्थित होते.
रिसोडमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान २० कोटी रुपये निधी द्यावा. हायब्रिड ॲन्युईटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या मालेगावमधील पालखी रस्ता आणि रिसोड-वाशिम रस्त्यांच्या कामातील त्रुटी दूर कराव्यात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा मागण्या आमदार झनक यांनी केल्या.
रिसोड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात अमरावती विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणी दूर कराव्यात व दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.
