“मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?” आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल
मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारने कोविड-१९ विशेष पॅकेज जाहिर केल्यावर त्याचे स्वागत केले होते व त्याच सोबत मुंबईसाठी विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी केली. या मागणीची खिल्ली उडवत आशिष शेलार यांनी फेसबुक च्या माध्यमातून संजय राऊत यांचा ‘पत्रपंडित’ असा उल्लेख करत खोचक टीका केली आहे.
आपल्या पोस्ट मध्ये आशिष शेलार म्हणाले की, “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!
तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?
हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!
मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? हे सांगा,
मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? हे सांगा
मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा
मुंबई पुरामुळे तुंबणार नाही,
याची हमी द्या!!
केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना!”
