अरविंद सावंत यांनी भाजपवर सोडला बाण, दिला मंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याबाबत राज्यपालांकडून शिवसेनेला कळवण्यात आले आहे. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली असून महाशिवआघाडीची मोट पक्की होत असल्याची जे चिन्ह असल्याचे मानले जाते.

