माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त मान्यवरांकडून आदरांजली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं मनापासून कौतुक, त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क प्रस्थापित केला असल्याचही एका ट्विटमध्ये मोदी यांनी सांगितलं.
माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्त मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भेट दिली.
