आंध्रप्रदेश सरकारचा सिक्सर; बलात्काऱ्यांना २१ दिवसात फाशी!
हैदराबाद: आंध्रप्रदेश विधानसभेत आज शुक्रवारी एक महत्त्वाचं विधेयक संमत करण्यात आलं. संमत झालेल्या विधेयकानुसार (आंध्रप्रदेश दिशा बिल २०१९) नुसार बलात्कार आणि सामूहिक बलात्काऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची सूट असेल. याच सोबत या प्रकरणांची सुनावणी २१ दिवसात संपवावी लागेल.