आंध्रप्रदेशात एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह टीडीपी चे अनेक नेते कैदेत
आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेश पोलिसांनी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) चे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवलंय. त्याचवेळी त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना अटक करण्यात आली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत उपोषणाला बसणार होते. त्याचसाठी सकाळी चंद्राबाबूंच्या निवासस्थानी जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज टीडीपी ने चलो ‘चलो अत्तमाकुर’ चे आवाहन केले होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. यामुळे या सर्वांना अटक करण्यात आली होती. आंध्रप्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीडीपी चे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस वर मुस्कटदाबी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
