माजी खासदार आनंद परांजपे निघाले कोरोना पॉसिटीव्ह; राजकीय कार्यकर्त्यांत चिंतेचे वातावरण
ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद परांजपे हे कोरोना पॉसिटीव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत मदत कार्यात तेही सहभागी होते. या पूर्वीच आव्हाड यांच्या सुरक्षा ताफ्यातील काही पोलीसांना कोरोनाचा लागण झाली आहे. आनंद परांजपे यांचेही आव्हाड यांच्या घरी या काळात अनेकदा येणे जाणे झाले होते.
मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या सेल्फ क्वारंटाईन झालेले आहेत. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोरोनाने आता राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांवर हल्ला करायला सुरुवात केल्यामुळे या सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
