मनसे नेते अमित ठाकरेंनी काका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली ‘ही’ सूचना
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपले काका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे कोविड-१९ संदर्भात एक सूचना केली आहे.
सध्या कोविड-१९ ची लक्षणं असलेले नागरिक जेव्हा कोणत्या रुग्णालयात जातात तेव्हा तिथे कित्येकदा खाटांची उपलब्धता नसते अशावेळी मोठी गडबड होते. याच समस्येचा धागा पकडत अमित ठाकरे यांनी कोविड विशेष रुग्णालयांतील खाटांचे स्टेटस रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कळावे म्हणून एक अँड्रॉइड ऍप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे. याबाबत आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये ते म्हणाले की, “महाराष्ट्रात कोरोना वायरस (covid 19) व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना माहित नसल्यामुळे काही नागरिकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे, तरी त्यांची अशी व्यथा रोखण्यासाठी मी एक उपाय महाराष्ट्र शासनाला खालील पत्र पाठवून सुचविला आहे.”

