कॅबिनेट ची आज पहिली बैठक, अमित शहा यांनी मिळू शकते गृह किंवा अर्थ खाते
नवी दिल्ली: मोदी कॅबिनेट ची पहिली बैठक आज दिल्लीत होत आहे. नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची कमान हाती घेतली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हजारो लोकं व अनेक खास पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. मोदींसोबत एनडीए मधील ५७ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अद्याप मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. परंतु, सुत्रांच्या माहितीनुसार असं मानलं जातं की भाजपच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या अमित शहा यांना गृह किंवा अर्थ मंत्रायलायची जबाबदारी मिळू शकते. त्याचवेळी माजी विदेश सचिव एस. जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री बनवलं जाऊ शकतं.